चौधरीकडून पावणे दोन टन माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:48 AM2018-01-10T00:48:41+5:302018-01-10T00:52:04+5:30
सिडको : बॉश कंपनीतील भंगार माल उचलण्याचा ठेका घेऊन कंपनीच्या काही अधिकाºयांना हाताशी धरून भंगार मालाबरोबरच चांगल्या मालाची चोरी करणारा ठेकेदार तथा प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी ऊर्फ छोटू चौधरी याच्याकडून अंबड पोलिसांनी मंगळवारी लाखो रुपये किमतीचा आणखी पावणेदोन टन माल जप्त केला़ संशयित चौधरी बुधवारी (दि़१०) प्रत्यक्ष बॉश कंपनीत जाऊन पोलिसांना चोरीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे़ दरम्यान, या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप तपासात समोर आला असून, त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे़

अंबड पोलिसांनी संशयित चौधरीच्या सातपूर-अंबड लिंक रोड परिसरातील आझादनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला कंपनीचा लाखो रुपयांचा १़७५ टन भंगार माल जप्त केला़ तसेच बॉश कंपनीत तयार होणारा माल, खराब माल कुठे ठेवलेला असतो तो कशापद्धतीने चोरी केला जात असे याचे प्रात्यक्षिकच चौधरी बुधवारी अंबड पोलिसांना दाखविणार आहे़ पोलिसांनी चौधरीच्या केलेल्या चौकशीत नगरसेवक व राजकीय व्यक्तींचा सहभाग समोर आला असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे़ याबरोबरच कंपनीतील काही सुरक्षारक्षक व वरिष्ठ अधिकाºयांचा सहभागही यामध्ये निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे़
फरार ठेकेदार चौधरी यास अंबड पोलिसांनी रविवारी (दि़७) इंदूरहून अटक केली़ सोमवारी (दि़८) त्यास न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत (दि़१०) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ बॉश कंपनीतील डिफेक्टिव व चोरी केलेला भंगार माल आणून यंत्राच्या सहाय्याने दुरुस्त करून तो महाराष्ट्रासह इतर राज्यांत विक्री करीत होता. सिडकोतील पंडितनगर येथून पोलिसांनी ११ कोटी रुपयांचा मालही जप्त केल्यानंतर काही नगरसेवक व राजकीय पुढाºयांनी हजेरी लावून सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता़ दरम्यान, चौधरीच्या कोठडीची मुदत बुधवारी संपणार असल्याने त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे़अधिकारी, कर्मचाºयांवर टांगती तलवार बॉश या नामांकित कंपनीचे वाहनांच्या महत्त्वाच्या सुट्या भागांबाबत असलेले पेटंट, कंपनीतून झालेली चोरी, डिफेक्टिव माल दुरुस्त करून त्याची होणारी विक्री याबाबतचा आढावा घेण्यासाठी जर्मनीतील अधिकारी नाशिकला येणार असून, याबाबत सखोल चौकशी करणार आहेत़ यामध्ये कंपनीतील अधिकारी वा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे़