महामार्गावरील वाळेलेली धोकेदायक दोन झाडे पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:28 PM2018-12-18T17:28:44+5:302018-12-18T17:36:24+5:30
औंदाणे : यशवंनगर (औदाणे) येथील गांवाजळील विंचुर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यालगत सुमारे ५० वर्षापासुन वाळलेली निंबाची धोकादायक झाडे वनविभाग व बांधकाम विभागाने तोडल्याने सदर मार्गावरील संभाव्य धोके टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

येथील महामार्गावर स्थानिक वबाहेरच्या वाहनाची मोठया प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी अनेक वर्षापासुन रस्त्यालगत दोननिबांची झाडे वाळलेलीअसून ही झाडे धोकादायक असल्याने येणाऱ्या-जाणाºया ग्रामस्थ व वाहनांना धोका असल्यामुळे
ग्रामपंचायत सदस्य शार्मिला गोसावी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोसावी, निरंजन बोरसे यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल फुसारे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र आधिकारी रमेश साठे यांची भेट घेवुन या वाळलेल्या धोकेदायक झाडांविषयी चर्चा केली व ते पाडण्याची विनंती केली. त्यानंतर लवकरच ही झाडेतोडण्यात येणार असल्याचे आधिकांºयांनी आश्वास न दिले होते. त्याप्रमाणे ही झाडे सोमवारी पाडण्यात आली.
...................
येथील महामार्गालगत अनेक वर्षापासुन ही धोकेदायक वाळलेली झाडे तोडावी याबाबत वनविभाग व बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. आज लगेच त्याची दखल घेतल्याने या महामार्गावरील धशेका टळला आहे.
- शर्मिला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य.