मालेगाव शहरातून दोन दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:19+5:302021-07-07T04:16:19+5:30
-------------------------- घरगुती वादातून डॉक्टरला मारहाण मालेगाव : घरगुती वादातून डॉक्टरला मारहाण करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व सोन्याची चेन असा ...
--------------------------
घरगुती वादातून डॉक्टरला मारहाण
मालेगाव : घरगुती वादातून डॉक्टरला मारहाण करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व सोन्याची चेन असा एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेणाऱ्या १५ जणांविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. किरण बारकू पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पती-पत्नीच्या भांडणानंतर सासरकडील नातेवाईकांनी मारहाण केली. गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली. तसेच कारची चावीही ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार पाटील हे करीत आहेत.
----
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील संगमेश्वर नगर भागात राहणाऱ्या नीता उर्फ वंशिका दिनेश गोपलानी या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दर्शना अंगनामल वर्यानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी नीता हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिनेश रमेशलाल गोपलानी, रमेशलाल किसनलाल गोपलानी, यशोदा रमेश गोपलानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आखाडे हे करीत आहेत.
-----------------------
विवाहितेला मारहाण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील झाडी येथील विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोनिका तुषार भारती या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती तुषार आंनदा भारती, सासू चंद्रकला आनंदा भारती, नणंद रोशन विजय गोसावी, जेठ दीपक आनंदा भारती, जेठाणी दीपाली दिपक भारती (सर्व रा. झाडी) यांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार गायकवाड हे करीत आहेत.
----
चाळीसगाव फाट्यावर दुकान फोडी
मालेगाव : येथील चाळीसगाव फाट्यावरील आदित्य कृषी एजन्सीचे दुकान व गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, २० हजार रुपये किमतीचा डी. व्ही. आर. व २ हजार रुपयांची रोकड असा ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी दीपक रमेश मालपुरे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बच्छाव हे करीत आहेत.
----
घरगुती वादातून मारहाण, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : शहरातील कुंभारवाडा भागातील घराच्या वादावरून १० ते १२ जणांनी महिलेला व तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुमताज रफीक सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. शायर पठाण, शबाना पठाण यांच्यासह १२ जणांना घराच्या वादावरून हॉकी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार ए. के. पाटील हे करीत आहेत.
-----