नाशकात आॅनलाइन फसवणुकीचे दोघे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:04 AM2020-02-12T01:04:57+5:302020-02-12T01:05:54+5:30
‘फोन-पे’वरील सवलत कूपनचे तसेच कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून आॅनलाइन मागविलेल्या वस्तूच्या ताब्यासाठी रक्कम भरावयास सांगून दोघांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : ‘फोन-पे’वरील सवलत कूपनचे तसेच कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून आॅनलाइन मागविलेल्या वस्तूच्या ताब्यासाठी रक्कम भरावयास सांगून दोघांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अॅड. किशन चावला यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २४ जानेवारी रोजी अज्ञात संशयिताने मोबाइलवर फोन केला. संशयिताने फोन पे या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. आर्थिक व्यवहारात ४ हजारांचे सवलतीचे कूपन मिळणार असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयिताने त्यांची गोपनीय माहिती त्या भामट्याने जाणून घेत १५ हजार ४०० रु पयांना गंडा घातला.
दुसऱ्या घटनेत देवळाली कॅम्प येथील अनुप व्ही. नारायण यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी आॅनलाइन वस्तू खरेदी केली होती. त्यांची वस्तू कुरियरच्या माध्यमातून येणार होती. परंतु ती वेळेत येत नसल्याने त्यांनी गुगल या संकेतस्थळावर कुरियर कंपनीचा संपर्क क्रमांक शोधला आणि त्यावर त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना पाथर्डी फाटा येथील एका कुरियर कंपनीच्या शाखेतून फोन आला व संशयिताने त्यांना वस्तू मिळविण्यासाठी गोपनीय माहितीची विचारपूस करत
आॅनलाइन ३६ हजार ४१४ रु पयांचा गंडा घातला.
या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.