दोन गावे, एका वाडीला टॅँकर
By Admin | Published: April 25, 2017 01:47 AM2017-04-25T01:47:04+5:302017-04-25T01:47:15+5:30
चांदवड : तालुक्यातील परसूल, हिरापूर (दरसवाडी) व नांदुरटेक येथील चिंचबारी वस्तीवरील ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथे शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
चांदवड : तालुक्यातील परसूल, हिरापूर (दरसवाडी) व नांदुरटेक येथील चिंचबारी वस्तीवरील ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथे शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. शरद मंडलिक व पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे सी. जी. मोरे यांनी दिली.
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे बऱ्यापैकी झाल्याने तालुक्याला यंदा उशिरा एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील सुमारे ७० गावांना ओझरखेड धरणावरील नळ योजनेद्वारे, तर १६ गावांना नाग्यासाक्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यास पाणी पातळी घटेल तेव्हा टॅँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्तता प्रशासनाने वर्तवली आहे.
ज्या गावांकडून पाण्याच्या टॅँकरची मागणी येते त्या गावांचा तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता संयुक्त पाहणी दौरा करतात. त्यांनी टॅँकर सुरू करण्याचा अहवाल दिल्यानंतरच, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने तेथे टॅँकर सुरू करण्यात येतो, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)