नाशिकमधील चुंचाळे परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:14 IST2020-06-22T15:12:43+5:302020-06-22T15:14:22+5:30
नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मुलगा व एका मुलीचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या भागातील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नाशिकमधील चुंचाळे परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचे अपहरण
नाशिक : चुंचाळे परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मुलगा आणि एका मुलगी असे दोघांचे अपहरण झाल्याच्या घटना गेल्या आठवड्यात घडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपहृतांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाची पहिली घटना गुरुवारी (दि.१८)दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वरचे चुंचाळे येथील सूरज अपार्टमेट येथे घडली . अज्ञात इस्माने एका महिलेच्या रखवालीतून तीच्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पावरा अपहृत मुलाचा शोध घेत आहेत. तर दुसरी घटना रविवारी (दि.२१) सकाळी दहा वाजेच्या सुमारास चुंचाळ््यातील घरकुल योजनेच्या वसाहतीत घडली. याठिकाणी अपहृत मुलगी आणि तीची आई राहत असताना मुलीला अज्ञाात इस्माने घरातून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद अपहृत मुलीच्या आईने दिली असून पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे या प्रकरणाता तपास करीत नाही. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणात अपहणाचे गुन्हे दाखले केले आहे.