दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:00+5:302021-03-14T04:14:00+5:30

--------------------- मालेगावातून दुचाकी लंपास मालेगाव : येथील पुणा गॅरेज परिसरातून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून ...

Two-wheeled collision; One killed | दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

Next

---------------------

मालेगावातून दुचाकी लंपास

मालेगाव : येथील पुणा गॅरेज परिसरातून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. याप्रकरणी शर्जील अहमद शरी यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच ४१ झेड ६८१५) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

-----------------

मालेगावी विवाहितेचा छळ

मालेगाव : धंदा वाढवण्यासाठी माहेरून ५० हजार आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध व पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरजाना गफार कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे. पती गफार मुसा कुरेशी, खलील मुसा कुरेशी, मुक्तार मुसा कुरेशी, खलील मुसा कुरेशी, जलील मुसा कुरेशी यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----------------------

३० हजारांसाठी महिलेचा छळ

मालेगाव : माहेरून ३० हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध रमजानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नूरनगर परिसरात राहणाऱ्या रुबिनाबी शेख आरिफ शेख यांनी फिर्याद दिली आहे. माहेरून पैसे आणावेत म्हणून पती शेख आरिफ शेख याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------

दुचाकीसाठी विवाहितेचा छळ

मालेगाव : नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेरून ८० लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह तीन जणांविरुद्ध रमजानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साजदा परवीन मोहम्मद वाजीद अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे. पती मोहम्मद वाजीद मो. आबीद, मोहम्मद तालिब मोहम्मद, नेहा मो. तालिब यांनी छळ केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

Web Title: Two-wheeled collision; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.