दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:31 AM2018-11-06T01:31:31+5:302018-11-06T01:31:47+5:30

रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत बळजबरीने वाद घालून कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना पंचवटी परिसरात जनार्दननगर भागात घडली. जखमी अनिल गोसावी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

The two-wheeler attacked with sharp weapon | दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला

दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला

Next

नाशिक : रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत बळजबरीने वाद घालून कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना पंचवटी परिसरात जनार्दननगर भागात घडली. जखमी अनिल गोसावी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोपटराव रामभाऊ काकळीज (६८ रा. म्हसरूळ) हे शनिवारी रात्रीच्या सुमारास अनिल वाल्मीक गोसावी (३९) यांच्यासमवेत दुचाकीवरून जनार्दननगर परिसरातून मार्गस्थ होत होते. यावेळी पाठीमागून एका दुचाकीवर तिघे अज्ञात युवक आले आणि त्यांनी काकळीज यांच्या दुचाकीला ‘कट’ देत खाली पाडले. तिघा संशयितांनी काकळीज व गोसावी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने गोसावी यास मुलीची छेड का काढतो, असे म्हणत त्याच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गोसावी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक गिरमे करीत आहेत.
ट्रॅक्टर उलटल्याने एक ठार
नाशिक : गौळाणे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली
आहे. संतोष मधुकर चारोस्कर (रा. दीक्षी गौळाणे) असे मृताचे नाव आहे. चारोस्कर रविवारी (दि.४) लोकेश गवळी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना हा अपघात झाला. गौळाणे शिवारातील कचरा डेपोजवळच्या चौफुलीवर भरधाव ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात चारोस्कर गंभीर जखमी झाले. मालक गवळी यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The two-wheeler attacked with sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.