उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:18 AM2018-04-03T00:18:30+5:302018-04-03T00:18:30+5:30

शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 Two-wheeler bunker on the flyover! | उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

Next
ठळक मुद्देअपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशीपुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला

नाशिक : शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाºया मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गरवारे पॉइंटपासून ठिकठिकाणी लहान ओव्हरब्रिज तयार करण्यात आले असून, या पुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला आहे, तर प्रकाश हॉटेल ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सर्वाधिक सुमारे सहाकिलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावरून रिक्षा, दुचाकी, फाइव्ह व्हिलर या वाहनांना पहिल्या दिवसांपासूनच बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनी समांतर किंवा पुलाखालील रस्त्याचा वापर करावा, असे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. परंतु असे असतानाही उड्डाणपुलावरून राजरोसपणे दुचाकी, तीनचाकी वाहनांची वर्दळ कायम असून, त्यातून लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मार्च २०१४ मध्ये या उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भरधाव वेगाने जाणाºया दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने दोघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती व त्यामुळेच सदरचा निर्णय घेण्यात आला होता. प्रारंभी उड्डाणपुलाचा वापर करणाºया दुचाकी, तीनचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जात होती. कालांतराने मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर ट्रिपल सीट दुचाकीवरून उड्डाणपुलाचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जात आहे.
अपघाताला जबाबदार
दोन आठवड्यांपूर्वी भरधाव वेगाने जाणारी दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व वाढत्या अपघाताला वाहतूक पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राष्टय महामार्ग प्राधिकरणाने दुचाकी वाहनांना बंदी घातलेली असताना त्याची अंमलबजावणी मात्र पोलीस करीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलावर तसेच ज्या ज्या ठिकाणांहून पुलावर वाहनांना चढण्यासाठी सोय करण्यात आली आहे अशा सर्वच ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.

Web Title:  Two-wheeler bunker on the flyover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात