दुचाकीने आले अन‌् महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 03:53 PM2020-11-02T15:53:03+5:302020-11-02T15:56:22+5:30

शहरात सोनसाखळी चोरीचा सिलसिला नित्यनेमाने सुरुच आहे. दररोज शहरात कोणत्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारचा गुन्हा दाखल होत आहे.

The two-wheeler came and snatched the five-pound gold chain from the woman's neck and fled. | दुचाकीने आले अन‌् महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळाले

दुचाकीने आले अन‌् महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळाले

Next
ठळक मुद्देटोळी गजाआड करण्यास पोलिस अपयशीसोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरुच

नाशिक : गंगापूररोडवरील शहीद चौकातून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी रविवारी (दि.१) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या फिर्यादीनुसार दीड लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

शहरात सोनसाखळी चोरीचा सिलसिला नित्यनेमाने सुरुच आहे. दररोज शहरात कोणत्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारचा गुन्हा दाखल होत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सोनसाखळी चोरांनी शहरातील विविध उपनगरांमध्ये थैमान घातले असताना पोलिसांना मात्र चोरट्यांची ही टोळी गजाआड करण्यास अद्यापही यश आलेले नाही.  पाहुण्यांकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी पायी जात असलेल्या फिर्यादी रेखा दत्तात्रेय कानकाटे (५५, रा. हनुमानवाडी, पंचवटी) यांच्या समोरुन यामाहा या दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. कानकाटे यांना चोरट्यांचे वर्णन लक्षात राहिले नसले तरी त्यांनी दुचाकी मात्र ओळखून चोरट्यांच्या दुचाकीचे वर्णन पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी तत्काळ परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकांना सतर्क राहत पेट्रोलिंगदरम्यान संशयित यामाहा दुचाकीचा शोध घेण्याचा आदेश दिला गेला.

Web Title: The two-wheeler came and snatched the five-pound gold chain from the woman's neck and fled.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.