दुभाजकावर दुचाकी  आदळून दोघा मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:06 AM2018-11-26T01:06:09+5:302018-11-26T01:06:23+5:30

त्र्यंबकरोडवरील रस्ता दुभाजकावर भरधाव हार्ले डेव्हिडसन ही महागडी दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शहरातील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसाद भागवत शेरमाळे (२९, रा. डीजीपीनगर-१) व रोशन चंद्रकांत हिरे (२९, रा. तिडके कॉलनी, बाजीरावनगर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत़

 Two-wheeler death on two-wheeler collapsed on divisiveness | दुभाजकावर दुचाकी  आदळून दोघा मित्रांचा मृत्यू

दुभाजकावर दुचाकी  आदळून दोघा मित्रांचा मृत्यू

Next

नाशिक : त्र्यंबकरोडवरील रस्ता दुभाजकावर भरधाव हार्ले डेव्हिडसन ही महागडी दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शहरातील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसाद भागवत शेरमाळे (२९, रा. डीजीपीनगर-१) व रोशन चंद्रकांत हिरे (२९, रा. तिडके कॉलनी, बाजीरावनगर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत़ दरम्यान, या अपघाताची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास प्रसाद व रोशन हे दोघे हॉटेल ग्रीन व्ह्यूकडून  हार्ले डेव्हिडसन (एमएच १५, एफपी ००९८) या दुचाकीने जिल्हा रुग्णालयाकडे येत होते़ त्र्यंबकरोडने येत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व ते रस्ता दुभाजकावर जाऊन आदळले़ हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोघांच्याही डोक्यास मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़
मयत प्रसाद शेरमाळे याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले होते तसेच तो वडिलांसोबत बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता़ एकुलता एक असलेल्या प्रसादच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे़ तर रोशन हिरे या तरुणाचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता़ चांगल्या स्वभावाने तो परिसरातील सर्वांच्या परिचयाचा होता़
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोघांच्याही नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे़

Web Title:  Two-wheeler death on two-wheeler collapsed on divisiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.