बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:14+5:302021-06-06T04:11:14+5:30

मृत पवार हे आपल्या कुटुंबीयांसह नांदीन शिवारात वास्तव्यास होते. शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी उशिरा हीरो होंडा मोटारसायकलने पिसोळबारीमार्गे ...

Two-wheeler farmer killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार शेतकरी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार शेतकरी ठार

Next

मृत पवार हे आपल्या कुटुंबीयांसह नांदीन शिवारात वास्तव्यास होते. शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी उशिरा हीरो होंडा मोटारसायकलने पिसोळबारीमार्गे दिघावे येथे ते अंडी घेण्यासाठी गेले होते. अंडी घेऊन ते घराकडे निघाले असता पिसोळबारीमध्ये त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना दुचाकीवरून खाली पाडले व ओढत ओढत त्यांना झाडाझुडपांमध्ये नेत पवार यांच्या शरीराचे लचके तोडत ठार केले. सायंकाळी अंडी घेण्यासाठी गेलेले नंदकिशोर पवार हे रात्र उलटूनही घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला असता, त्यांची मोटारसायकल पिसोळबारी घाटाच्या पायथ्याशी बेवारस आढळून आली. घटनास्थळी ओढून नेल्याचे निशाण मातीत दिसल्याने त्यांचा परिसरात शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत डोंगरावर आढळून आला. या खळबळजनक घटनेची माहिती जायखेडा पोलीस व ताहाराबाद वनपरिक्षेत्र यांना मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

इन्फो

सीमारेषेवरून संभ्रम

घटनास्थळ हे धुळे व नाशिकच्या सीमारेषेवर असल्याने पोलिसांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर घटनास्थळ धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असल्याचे निश्चित झाल्याने पिंपळनेर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून, पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण मालके पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पवार यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. नामपूर ग्रामीण रुग्णालयात मृत नंदकिशोर यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येऊन दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इन्फो

आमदारांनी केली पाहणी

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या परिसरात तत्काळ पिंजरे लावण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, घटना साक्री तालुक्यात वर्ग झाल्याने आमदार बोरसे यांनी थेट धुळे विभागाचे मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्याशी संपर्क साधून शासन नियमाप्रमाणे पवार कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्याच्या सूचना केल्या. पवार यांच्या वारसांना पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत वनविभागाकडून केली जाणार असल्याचे धुळ्याचे मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी सांगितले.

कोट....

बागलाण तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. परंतु, त्यांच्यासाठी असलेले संरक्षित क्षेत्र कमी असल्यामुळे बिबट्या नागरी वसाहतीत संचार करत आहेत. नागरिकांनी देखील वनक्षेत्रालगत अथवा शेतात रात्रीच्या वेळी सावधानता बाळगावी.

- नीलेश कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ताहाराबाद

फोटो - ०५ नंदकिशोर पवार

फोटो- ०५ सटाणा बिबट्या

पिसोळबारी घाटातील दरीत घटनास्थळी जाऊन पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे, समवेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी.

===Photopath===

050621\05nsk_18_05062021_13.jpg~050621\05nsk_19_05062021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०५ नंदकिशोर पवार ~फोटो- ०५ सटाणा बिबट्या

Web Title: Two-wheeler farmer killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.