एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:14 AM2021-10-08T01:14:58+5:302021-10-08T01:17:12+5:30
भरधाव वेगाने एसटीबस चालवून दुचाकीस्वारास गंभीर जखमी करून दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालकाविरुद्ध शहर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
येवला : भरधाव वेगाने एसटीबस चालवून दुचाकीस्वारास गंभीर जखमी करून दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालकाविरुद्ध शहर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
एसटी बसचालक गणेश नाना सळुखे (रा. मोतीबाग नाका, मालेगाव) यांनी भरधाव वेगाने बास (एमएच २० बीएल ३४२४) चालवून ओव्हरटेक करताना दुचाकीला (एमएच १५ एचडी ९३५३) समोरून ठोस मारली. या अपघातात दुचाकीस्वार सोमनाथ कुदळ गंभीर जखमी झाले तर, दुचाकीचेही बरेच नुकसान झाले.
सदर अपघात बाभूळगाव शिवारात मनमाड-येवला रोडवर २६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संदीप दौलत कुदळ (२९, रा. ठाणगाव पिंप्री, ता. येवला) यांच्या फिर्यादी वरून बसचालक गणेश सळुखे विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. एस. सोनवणे हे करत आहेत.