ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार(टिप-ट्रक-मॅजिक बातमीत शब्द बोल्ड केला आहे. कृपया पाहणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:04+5:302021-02-20T04:40:04+5:30
--------------------------------- विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू सिन्नर: तालुक्यातील पांगरी शिवारात रानमळा परिसरात विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या विजेचा ...
---------------------------------
विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
सिन्नर: तालुक्यातील पांगरी शिवारात रानमळा परिसरात विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या विजेचा शॉक बसून, त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप एकनाथ कांडेकर (४०) असे मृत युवकाचे नाव आहे. कांडेकर हे विहिरीवर असलेली विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले असता, त्यांना शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------------------------------------------
ट्रक-मॅजिक अपघातात एकाचा मृत्यू
सिन्नर: सिन्नर-घोटी महामार्गावर हरसुले शिवारात ट्रक व मॅजिक गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मॅजिक गाडीतील भरत एकनाथ डावरे (५०) यांचा मृत्यू झाला. घोटीकडून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक (क्र.एज्ञ. एच. १५ बी. जे. ६९३५)ने समोरून येणाऱ्या मॅजिक गाडीला धडक दिली. या अपघातात भरत डावरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------
दातली येथून दोन गायींची चोरी
सिन्नर: तालुक्यातील दातली येथून दोन गायींची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महेश खंडेराव नागरे (२५) यांनी राहत्या घरासमोर त्यांच्या दोन गायी बांधल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी रात्री सदर गायी चोरून नेल्या. पहाटे जनावरांना चारा टाकण्यासाठी नागरे उठले असता, त्यांना दोन गायी गोठ्यात नसल्याचे दिसले. नागरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची फिर्याद दिली आहे.
-------------------------------------
युवकावर जीवघेणा हल्ला
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील हॉटेलमध्ये पांगरी खुर्द येथील निखिल रामभाऊ पांगारकर (३१) या युवकाच्या पोटात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सदर युवक हॉटेलमध्ये जेवण करीत असताना, संशयितासोबत झालेल्या वादातून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पोलिसांनी संशयित आरोपी भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संशयितास न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते अधिक तपास करीत आहेत.