ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

By admin | Published: February 19, 2017 12:06 AM2017-02-19T00:06:57+5:302017-02-19T00:06:57+5:30

तिरोडा-खैरलांजी मार्गावर पालडोंगरी गावाजवळील नाल्याजवळ एका भरधाव ट्रॅक्टरने अ‍ॅक्टीव्हा गाडीला दिलेल्या धडकेत एक महिला ठार

Two wheeler men killed in tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

Next

नाशिक : शहरांमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या ग्रामीण तरुणांसमोर प्लंबिग, हाउसकिपिंग यांसारखी कामे करताना मानसन्मानाचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय अशाप्रकारे रोजगार मिळवूनही आयुष्यभर ‘मरण येत नाही, म्हणून जगत राहावे’ अशा स्थितीत अनेकांना संपूर्ण आयुष्य घालवावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील संसाधनांचा योग्य वापर करून तरुणांसाठी सन्मानजनक रोजगार निर्मिती होण्याची आवश्यकता आहे, असे मत भारत विकास समूहाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केले.  ‘संवाद २०१७’ कार्यक्रमात नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथे आले असताना गायकवाड यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी लोकमत चमूशी संवाद साधताना गायकवाड यांनी यशस्वी जीवनप्रवासातील विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. ते म्हणाले, आजपर्यंतच्या प्रवासात कधीही खोटे बोललो नाही. कोणाशीही स्पर्धा केली नाही. जे काम केले, ते चांगले केले. त्यामुळेच जे काम हाती घेतले त्यात यश प्राप्त झाले आणि भारत विकास प्रतिष्ठानचा व्याप वाढत गेला. या प्रवासात सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने कामात प्रगती साधता आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.  या चर्चेत ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, फिचर एडिटर अपर्णा वेलनकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख सहभागी झाले होते. यावेळी गायकवाड यांच्या समवेत विजय हाके, जयदीप  निकम, बाळासाहेब कंकराळे, सुनील ठाकरे, श्रीकांत आंबरे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बुकलेट अ‍ॅप
हनुमंतराव गायकवाड यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या सहकारी व कुटुंबीयांना दिले. सहकारी समूहात काम करताना ते स्वत:चे आहे, असे समजून काम करतात, असे ते म्हणाले. सहकाऱ्याच्या कामाचे उदाहरण देताना बीव्हीजीच्या बूकलेट अ‍ॅपची ओळख करून दिली. समूहातील सनदी लेखापाल अमृत देशमुख यांनी हे अ‍ॅप तयार केले असून, या अ‍ॅपमध्ये कृषीसह विविध विषयांवरील पाचशे पुस्तकांचा लिखित व कथन स्वरूपातील सारांशाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी देशमुख यांनी एक पुस्तक तीनवेळा वाचून त्यातील विविध विषय सारांश रूपात मांडला आहे. त्यामुळे ज्यांना वाचन शक्य नाही अशा व्यक्तींसाठी हे अ‍ॅप मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

Web Title: Two wheeler men killed in tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.