दुचाकी, भ्रमणध्वनी चोरणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:18 AM2019-06-08T01:18:05+5:302019-06-08T01:18:19+5:30
नाशिक शहरातून दुचाकी चोरुन सुरगाणा तालुक्यात विक्री करणाºया संतोष भास्कर जाधव (२०), रा. जालना यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मालेगाव : नाशिक शहरातून दुचाकी चोरुन सुरगाणा तालुक्यात विक्री करणाºया संतोष भास्कर जाधव (२०), रा. जालना यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव चौफुली परिसरातील पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या कारमधून भ्रमणध्वनी चोरणाºया शकील अहमद मोहंमद हनिफ (३८), रा. रोशनाबाद, शेख शाहरुख शेख मुश्ताक, रा. गयाननगर, मालेगाव या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून भ्रमणध्वनी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोंबीग आॅपरेशन राबवित आहेत. सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. नाशिक, सापुतारा महामार्गावर पथक गस्त घालीत असताना दिंडोरी बाजुकडून नाशिककडे दुचाकीवर येत असलेल्या संतोष जाधव याला अडवून दुचाकीच्या कागदपत्रकांची मागणी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारातुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासणी केली असता नाशिक व दिंडोरी परिसरातुन त्याने सहा दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त केल्या आहेत.
चार गुन्हे उघडकीस
मालेगाव शहरालगतच्या चाळीसगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर नागपूर येथील राकेश डेकाटे यांचा महागडा भ्रमणध्वनी चोरीला गेला होता. पोलीसांनी या प्रकरणी शकील अहमद व शेख शाहरूख याला अटक केली आहे. त्यांच्याकडून भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरीचे तीन व भ्रमणध्वनी चोरीचा एक असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.