दुचाकीवरील संशयितांनी दोन मोबाइल खेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:17 IST2018-10-19T01:16:53+5:302018-10-19T01:17:47+5:30
दुचाकीवर आलेल्या संशयितांनी विवाहिता व एका तरुणाच्या हातातील मोबाइल खेचून नेल्याची घटना द्वारका हॉटेल व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुचाकीवरील संशयितांनी दोन मोबाइल खेचले
नाशिक : दुचाकीवर आलेल्या संशयितांनी विवाहिता व एका तरुणाच्या हातातील मोबाइल खेचून नेल्याची घटना द्वारका हॉटेल व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मालेगावच्या आझाद चौकातील रहिवासी नयना मोरे या द्वारका हॉटेलच्या समोरून पायी जात होत्या़ यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी त्यांची पर्स व मोबाइल खेचून नेला़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी विशाल दरेकर हा रात्री ८ वाजेच्या सुमारास काठे गल्लीतील मारुती वेफर्सजवळून पायी जात होता़ यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांच्या हातातील मोबाइल फोन बळजबरीने हिसकावून नेला़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़