नाशकात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ; एकाच दिवशी तीन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:26 PM2019-08-13T14:26:23+5:302019-08-13T14:30:08+5:30
नाशिक शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाशकातील भद्रकाली, गंगापूर आणि पंचवटी भागातून या दुचाकी चोरीला गेल्या असून तिन्ही प्रकरणांमध्ये अज्ञातांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक : शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भद्राकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठेतील ७ आॅगस्ट रात्री ११ वाजेपासून ते ८ आॅगस्ट रात्री सव्वाआठ वाजेदरम्यान अंदाजे वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. निलेश दिगंबर शेटे (२९) यांनी या प्रकरणी त्यांची दुचाकी क्रमाक एमएच१५ सीएल ९६५५ अज्ञात चोरट्याने घरापासून चोरून नेल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हवालदार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. तर दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. ध्रुवनगर येथील ईरा आयएनो सोसायटीतीली संदीप गंगाधर वरखेडे (२६) यांची १५ हजार रुपये किंमतीची एमएच२१डब्लू २७१३ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी वरखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पी.जी. भूमकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पंचवटीत दुचाकी चोरीची तीसरी घटना घडली. रामकुंडाजवळील घोडे तबेल्यासमोरील मोकळ््या जागेत अजय सुनील जिवडे (२६) यांची रुपेरी रंगची एमएच १५ जीएस ६६४७ मोपेड दुचाकी सोमवारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार वनवे या प्रकरणाचा तपास करीत आहे.