ताहराबादला दुचाकी चोरीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 04:14 PM2019-03-21T16:14:28+5:302019-03-21T16:14:49+5:30

वाढती गुन्हेगारी : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Two-wheeler theft session in Taharabad | ताहराबादला दुचाकी चोरीचे सत्र

ताहराबादला दुचाकी चोरीचे सत्र

Next
ठळक मुद्देमोटरसायकल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद होऊनही पोलीसांना चोर हाती लागलेला नाही.

ताहाराबाद : गेल्या काही दिवसांपासून ताहाराबाद भागात दुचाकी मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेलाही अपयश येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ताहाराबाद येथील विजय शांताराम गांगुर्डे यांची हिरोहोंडा स्लेंडर (एम एच ४१ पी ५३७१) चोरीस गेली ,तसेच न्युप्लाँट येथील शिक्षक केदार गंगाधर अहिरे यांची होंडा शाईन (एम एच ४१ वाय ७०३) घराबाहेरून रात्रीच्या सुमारास चोरीस गेली. क्रांतीनगर येथील रविकांत साबळे यांची फॅशन प्रो (एम एच ४१ एएम ५१५५), बसस्थानकातील कँन्टीन चालक जितेंद्र रावल यांची हीरो होंडा (एमएच १५ ए आर ९७८५) भर दिवसा चोरीला गेली. मोटरसायकल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद होऊनही पोलीसांना चोर हाती लागलेला नाही. किशोर नेरकर यांच्या ममता प्रोव्हीजन समोरु न भरदिवसा हीरो होंडा स्पेलंडर चोरीस गेली आहे. तसेच पंधरा दिवसापुर्वी दसवेल येथील शेतकरी प्रदिप बोरसे यांच्या दोन मोटरसायकली अ‍ॅक्टीव्हा (एम एच ४१ ए आर २५७०) आणि पॅशन (एम एच ४१ ए आर ५९७७) घरा पासुन चोरीस गेल्या आहेत.
परिसरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणेने याबाबत गांभीर्याने तपास करत नागरिकांना दिलासा दयावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Two-wheeler theft session in Taharabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.