दुचाकीचा वाहन बाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:30 AM2017-09-28T00:30:11+5:302017-09-28T00:30:17+5:30

नवरात्र व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत असून, अनेकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच वाहन खरेदीला सुरुवात केली आहे. अष्टमी, नवमी अन् दसºयाच्या दिवशी नवी कोरी दुचाकी घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन असून, जीएसटी लागू झाल्यानंतरही नवरात्रीमुळे दुचाकींच्या मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे.

Two-wheeler vehicle market rally | दुचाकीचा वाहन बाजार तेजीत

दुचाकीचा वाहन बाजार तेजीत

Next

नाशिक : नवरात्र व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत असून, अनेकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच वाहन खरेदीला सुरुवात केली आहे. अष्टमी, नवमी अन् दसºयाच्या दिवशी नवी कोरी दुचाकी घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन असून, जीएसटी लागू झाल्यानंतरही नवरात्रीमुळे दुचाकींच्या मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे.
शहरातील दुचाकींच्या शोरूममध्ये अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. काहींनी डाऊन पेमेंट अदा केले आहे, तर अनेकांची बँकेची कर्जप्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे तीन ते चार हजार वाहने आरटीओकडे नोंदणीसाठी गेली असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. तर अनेक ग्राहकांनी दिवाळीला आपली दुचाकी घरी नेण्याचे नियोजन केले असून ते आतापासूनच रंग व विविध फिचर्सची माहिती घेऊन दुचाकीची बुकिंग करीत आहेत.  वाहन विक्रीच्या दालनांत ग्राहकांची गर्दी असून त्यांना विविध फायनान्स कंपन्यांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, आरटीओ कार्यालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे पाठविणे, वाहनाचा विमा भरून घेणे आदी कामांसाठी प्रतिनिधींची लगबग सुरू आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणाºयांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्या विश्वासू मेकॅनिकचा सल्ला घेतला आहे. जास्त अ‍ॅव्हरेज देणाºया वाहनासोबतच पुढील खर्चाचा विचारही ग्राहकांकडून केला जात असून दीर्घकाळ दमदार कामगिरी करणाºया दुचाकी वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
नोटाबंदीनंतर दुचाकी वाहन बाजार पूर्णपणे बसला होता. त्यानंतर बीएस-वाहने बंद झाल्याच्या कालावधीत मोठमोठ्या सवलती देऊन वाहनांची विक्री करावी लागली होती. याकाळात ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली. त्यामुळे या दसरा- दिवाळीत विक्रीविषयी साशंकता होती. मात्र दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहक आगाऊ बुुकिंग करीत आहे. नवरात्रीतही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- प्रकाश खैरनार, विक्री व्यवस्थापक, कमल आॅटोकेअर
बचतीच्या दृष्टीने ग्राहकांचा कल
दुचाकी वाहन बाजारात सध्या विना गियरच्या (मोपेड) वाहनांना मागणी वाढली आहे. कुटुंबातील स्त्री, पुरुषांना सहजगत्या वापरता येत असल्याने ग्राहकांची मोपेड दुचाकींना पसंती मिळत असून ही वाहने ११० ते १२५ सीसीच्या इंजिनमध्ये असल्याने इंधनासाठीही परवडणारी आहेत. त्यामुळे बचतीच्या दृष्टीने ग्राहकांचा कल या वाहनांकडे वाढतो आहे.

Web Title: Two-wheeler vehicle market rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.