नाशिकमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार; दोघे नायजेरियन गंभीर

By अझहर शेख | Published: October 20, 2023 05:22 AM2023-10-20T05:22:12+5:302023-10-20T05:22:25+5:30

बारदानफाटा : रात्री साडे अकरा वाजेची घटना 

Two-wheelers collide head-on in Nashik; Youth killed; Both Nigerian serious | नाशिकमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार; दोघे नायजेरियन गंभीर

नाशिकमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार; दोघे नायजेरियन गंभीर

नाशिक : गंगापूर रोडवरून जाताना दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार युवक राहुल प्रकाश राजगुरू (28,ध्रुवनगर) हा जागीच ठार झाला. दोघे दुचाकीस्वार नायजेरियन गंभीरपणे जखमी झाले आहेत. हे अपघात गुरूवारी (दि.१९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बारदानफाटा येथे झाल्याचे गंगापूर पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकीस्वार राहुल राजगुरू हा नाशिककडून गंगापूर बारदान फाट्याकडे घराच्या दिशेने जात होता. याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने भरधाव दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार दोघे नायजेरियन दुचाकीस्वार युवक व राहुल हे रस्त्यावर कोसळले. अपघात झाल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी व रस्त्याने ये-ज करणाऱ्या वाहनचालकांनी थांबून जखमींना मदत केली..

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जखमींना रिक्षांमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी हलविले होते. राहुल यास डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. तसेच नायजेरियन युवक अब्राहम केतार (२६) हा गंभीरपणे जखमी झाला आहे. तसेच त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक मामेर अकेच मथोठ हादेखील मध्यम जखमी झाला आहे.

अब्राहमवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या दोन्ही नायजेरियन जखमींना त्यांच्या मित्रांनी रात्री 1 वाजता खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले. घटनेची माहिती मिळताच राहुलच्या नातेवाईक व मित्र परिवाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.

Web Title: Two-wheelers collide head-on in Nashik; Youth killed; Both Nigerian serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.