दुचाकीस्वारांनी पादचाऱ्याचा मोबाइल खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:43 AM2018-07-01T00:43:06+5:302018-07-01T00:43:25+5:30

रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा महागडा मोबाइल दुचाकीवरील दोघा संशयितांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़

Two-wheelers drag the mobile to the pedestrians | दुचाकीस्वारांनी पादचाऱ्याचा मोबाइल खेचला

दुचाकीस्वारांनी पादचाऱ्याचा मोबाइल खेचला

googlenewsNext

नाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा महागडा मोबाइल दुचाकीवरील दोघा संशयितांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़  गंगापूररोडवरील पूर्णवादनगर येथील रहिवासी सुशांत सुनील पाटील हे रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सावरकरनगर येथील राठी बंगल्यासमोरून पायी जात होते. यावेळी पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी पाटील यांच्या हातातील ७५ हजार रुपयांचा अ‍ॅपल आयफोन एक्सटी हिसकावून फरार झाले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शेडच्या वादातून एकास मारहाण
शेड बांधण्याच्या वादातून एकास जबर मारहाण केल्याची घटना औरंगाबाद रोडवरील माडसांगवीजवळ असलेल्या मानूर येथे शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी घडली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित संतोष जिवा मिरके (२९, रा. मानूर गाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानूर येथील मच्छिंद्र पवार यांची गावात सर्व्हे नंबर १७९ च्या शेजारी जागा आहे. या जागेवर संशयित मिरके याने शेड बांधण्यास सुरुवात केल्याने त्यास पवार यांनी प्रतिबंध केला़ याचा राग येऊन मिरके याने लोखंडी गजाने पवार यांना जबर मारहाण केली़
दुचाकीवरून उतरताना पडलेल्या वृद्धाचा मृत्यू
दुचाकीवरून उतरताना तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना द्वारका परिसरातील चेतना हॉस्पिटलसमोर घडली़ बाजीराव भीमराव महाजन (६७, रा. मंगलमूर्ती अपार्टमेंट, द्वारका) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाजन हे बुधवारी (दि़२७) द्वारका येथील चेतना हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून खाली उतरत असताना तोल जाऊन डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तत्काळ पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या अपघाताची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
गोमांस बाळगणाºया दुचाकीस्वारास अटक
दुचाकीवरून गोमांसाची वाहतूक करणाºया संशयितास वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि़२९) द्वारका सर्कलवर अटक केली़ कुरेशी अझरुद्दीन मोहंमद सलिम (३०, चौक मंडई, भद्रकाली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दुपारच्या सुमारास संशयित कुरेशी हा अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून (एमएच १५, ईझेड ६७४३) बेकायदेशीररीत्या कत्तल केलेले गोमांस चोरट्यारीतीने विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheelers drag the mobile to the pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.