दुचाकीस्वारांनी पिशवीसह पळविली रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 06:48 PM2019-02-15T18:48:40+5:302019-02-15T18:52:58+5:30
मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, मालेगाव स्टँड सर्विस पेट्रोलपंपावर हिरावाडी येथील चेतन सुरेश चावरे हेल्पर म्हणून काम करतो. त्याच्याकडे बुधवारी रात्री व्यवस्थापक आनंदराव सुर्वे यांनी पेट्रोलपंपावर जमा झालेली रोकड एका कापडी पिशवीत भरून चिंचबनरोडवरील दीपज्योती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या प्रकाश प्रकाश मुनोत यांच्या घरी पोहोचण्यास सांगितले. त्यानुसार चावरे याने रोकड असलेली पिशवी दुचाकी वाहनाच्या डिक्कीत ठेवली व त्याच्यासमवेत प्रशांत धुळे याला जोडीला घेतले. काही वेळाने दोघेही चिंचबन परिसरात पोहोचल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अॅक्टिवा उभी करून ते रोकड असलेली बॅग मुनोत यांच्याकडे घेऊन जात असताना काळ्या पांढºया रंगाचे जाकीट घातलेले व नाका तोंडाला रुमाल बांधलेले पल्सरवरून जाणाºया दोघांनी जवळ येऊन हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व धुळे या दोघांनी आरडाओरड केला मात्र तरीदेखील भामट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून रामवाडीच्या दिशेने पलायन केले. भामट्यांनी पळविलेल्या पिशवीत ५० हजार रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांनी सांगितले.