अल्टो कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:36 PM2017-11-01T23:36:17+5:302017-11-02T00:15:13+5:30

औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याकडून हॉटेल जत्राकडे जाणाºया अ‍ॅक्टिवा दुचाकीस पाठीमागून भरधाव अल्टो कारने दिलेल्या धडकेत कोणार्कनगरमधील युवक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ कैलास एकनाथ पोटे (४०, रा़ कोणार्कनगर, आडगाव) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़

Two wheelers killed in Alto car crash | अल्टो कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अल्टो कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next

पंचवटी : औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याकडून हॉटेल जत्राकडे जाणाºया अ‍ॅक्टिवा दुचाकीस पाठीमागून भरधाव अल्टो कारने दिलेल्या धडकेत कोणार्कनगरमधील युवक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ कैलास एकनाथ पोटे (४०, रा़ कोणार्कनगर, आडगाव) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़  आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोटे आपल्या अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून (एमएच १५, एफ एक्स १२२२) नांदूर नाक्याकडून हॉटेल जत्राकडे जात होते़ माजी नगरसेवक सुनीता निमसे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगाने येणाºया अल्टो कारने (क्रमांक एमएच१५, बीएन५३९१) त्यांना जबर धडक दिली़ या धडकेमुळे रस्त्यावर फेकले गेलेले पोटे यांचे डोके, हात व पायास जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तपासून मयत घोषित केले़

Web Title: Two wheelers killed in Alto car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.