चेहडी फाट्यानजीक व्हॅनच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: June 17, 2014 00:07 IST2014-06-16T23:54:59+5:302014-06-17T00:07:51+5:30
चेहडी फाट्यानजीक व्हॅनच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

चेहडी फाट्यानजीक व्हॅनच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
ओझरटाऊनशिप : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या चेहडी फाट्यावर वळण घेत असलेल्या दुचाकीस्वारास बोलोरो पिकअप व्हॅनने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.
रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अरुण दशरथ बर्वे (५०) रा. सामनगाव, नाशिक हे त्यांच्या बॉक्सर सिटी १00 दुचाकीने (एमएच १५ बीपी १९६३) नाशिक-औरंगाबाद महामार्गाने चांदोरीकडे जात असताना त्यांनी चेहडी फाट्याजवळ वळण घेतले असता त्याच सुमारास मागून येणाऱ्या बोलोरे पिकअप व्हॅनने (एमएच १५ डीके ४५७८) त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात बर्वे हे गंभीर जखमी झाले असता त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात बोलोरोचालक समाधान त्र्यंबक टर्ले, रा. चांदोरी यांच्याविरुद्ध ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बोडे हवालदार एस. एन. केंग हे करीत आहेत (वार्ताहर)