शहरात दोन दुचाकींची चोरी, एकीची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:09 AM2018-07-27T01:09:26+5:302018-07-27T01:09:53+5:30

नाशिक : पंचवटीतील परिसरातील इंद्रकुंड आणि दिंडोरीरोडवरून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मखमलाबादरोड परिसरातील शांती कॉलनीतील ऋषिकेश उत्तम चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (दि. २२) मध्यरात्री दिंडोरीरोडवर पार्क केलेली २५ हजार रुपये किमतीची मोपेड एमएच १५ डीआर ८९२४ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

Two wheelers stolen in the city, fireworks | शहरात दोन दुचाकींची चोरी, एकीची जाळपोळ

शहरात दोन दुचाकींची चोरी, एकीची जाळपोळ

Next
ठळक मुद्देदोन दुचाकींची चोरी, एकीची जाळपोळ

 

नाशिक : पंचवटीतील परिसरातील इंद्रकुंड आणि दिंडोरीरोडवरून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मखमलाबादरोड परिसरातील शांती कॉलनीतील ऋषिकेश उत्तम चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (दि. २२) मध्यरात्री दिंडोरीरोडवर पार्क केलेली २५ हजार रुपये किमतीची मोपेड एमएच १५ डीआर ८९२४ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
दुसरी दुचाकी इंद्रकुंडावर असलेल्या शिवमुद्रा प्रतिष्ठान येथून चोरट्यांनी चोरून नेली आहे. पेठरोड परिसरातील रवींद्र अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, ३० हजार रुपये किमतीची होंडाशाइन दुचाकी क्रमांक एमएच १५ एफआर २८४२ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पेठरोडवरील वडारवाडीतून चोरलेली पल्सर दुचाकी नवनाथनगरमधील पंचशील कॉम्प्लेक्स येथे जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयित सूरज धोत्रे याने बजाज पल्सर दुचाकी एमएच १५ एफपी ८५३९ चोरल्यानंतर नवनाथनगरमधील पंचशील कॉम्प्लेक्स येथे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची फिर्याद अनिल म्हस्के यांनी दिली आहे. यात सीट, साईट पॅनल, पेट्रोल टाकी जळून खाक झाली.
एकास बेदम मारहाण
तपोवनातून आल्याच्या क्षुल्लक कारणावरून अनोळखी चौघांनी एकाला बेदम मारहाण करीत डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली. द्वारका परिसरातील स्वप्नील केशव मोटकरी (२८)यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (दि. २४) रात्री ८ वाजेच्या सुमारास मोटकरी हे द्वारका येथील विलास फूल भांडार येथे उभा असताना, अनोळखी चौघांनी तू तपोवनातून का आलास, असे विचारून मारहाण केली, तर एकाने हातातील वीट मोटकरीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर संशयित पसार झाले.
मोबाईल हिसकावला
सातपूर महापालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ तरुणाच्या हातातील १२ हजार रुपयांचा मोबाइल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. स्वारबाबानगर येथील विवेक अनिल चव्हाण गेल्या रविवार (दि.२२) सातपूरच्या मनपा विभागीय कार्यालयासमोरून पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला.

Web Title: Two wheelers stolen in the city, fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.