दुचाकींना दिली भरचौकात ‘फाशी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:05 AM2018-05-29T00:05:13+5:302018-05-29T00:05:13+5:30

माझ्यावर फाशी घेण्याची वेळ आली आहे... शिवसैनिकांनो मला वाचवा, असा संदेश लिहून दुचाकीने भरचौकात फाशी घेतल्याचे अनोखे आंदोलन करून शहर शिवसेनेच्या वतीने उच्चांकी इंधन दरवाढीचा निषेध केला. प्रधानमंत्री व पेट्रोलियममंत्री यांच्या प्रतीकात्मक वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांनी दुचाकीला फाशी दिली.

Two wheelers were handed down to death! | दुचाकींना दिली भरचौकात ‘फाशी’!

दुचाकींना दिली भरचौकात ‘फाशी’!

Next

मनमाड : माझ्यावर फाशी घेण्याची वेळ आली आहे... शिवसैनिकांनो मला वाचवा, असा संदेश लिहून दुचाकीने भरचौकात फाशी घेतल्याचे अनोखे आंदोलन करून शहर शिवसेनेच्या वतीने उच्चांकी इंधन दरवाढीचा निषेध केला. प्रधानमंत्री व पेट्रोलियममंत्री यांच्या प्रतीकात्मक वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांनी दुचाकीला फाशी दिली.  गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या उच्चांकी दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. केंद्र सरकारने निवडणुकीच्या वेळी दरवाढ नियंत्रणात ठेवण्याचे गाजर दाखवणाऱ्या सरकारने नागरिकांची घोर निराशा केली आहे. शिवसेनेच्या वतीने या इंधन दरवाढीचे जळजळीत निषेध करण्यासाठी येथील एकात्मता चौकात आंदोलन केले.  इंधन दरवाढीमुळे माझ्यावर फाशी घेण्याची वेळ आली असल्याची सूचना लिहिलेली मोटारसायकल भरचौकात फासावर लटकवण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलनात फाशी दिलेल्या दुचाकीला श्रद्धांजली अर्पण करताना शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे व अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करणारे स्टिकर वाहनांना चिकटवण्यात आले.  यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, संजय कटारिया, गोटू केकाण, जाफर मिर्झा, राजाभाऊ माळवतकर, कैलास गवळी, विनय अहेर, अप्पा आंधळे, महेंद्र गरुड, गणेश देशमुख, अमजद शेख, हर्षल पाटील, सुनील गवळी, लियाकत शेख, अंकुश गवळी, रमेश हिरण, मुराद शेख, कृष्णा जगताप, महिला आघाडीच्या संगीता बागुल, रेणुका जयस्वाल, लीला राऊत, अनुरेखा फर्नांडिस, सावित्री यादव, विद्या जगताप, कल्पना पाराशर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.  शिवसेनेची बांधीलकी सत्तेशी नसून जनतेशी असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेत असल्याचे सांगण्यात आले. इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल व डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणावे अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येर्ईल, असा इशारा देण्यात आला.

Web Title: Two wheelers were handed down to death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.