सिडकोतील कामटवाडे येथे दुचाकी जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:28 AM2019-08-22T00:28:10+5:302019-08-22T00:28:32+5:30
सिडको : येथील कामटवाडे भागात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढत सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली दुचाकी ...
सिडको : येथील कामटवाडे भागात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढत सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली दुचाकी जाळली. सिडको भागात दुचाकी जाळपोळीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. दुजाकी जाळणाऱ्या एकास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिडकोसह परिसरात समाजकंटकांकडून दुचाकी जाळण्याचे प्रकार कायम घडत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकार थांबले होते. परंतु मंगळवारपासून पुन्हा दुचाकी जाळपोळ झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामटवाडे येथील भाग्यश्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये मागील भांडणाची कुरापत काढत सोसायटीच्या शेजारीच राहणाºया देवकन तायडे याने जस्बीर कौर सिंधू यांच्या मालकीची एव्हिटर होंडा दुचाकी (क्रमांक एमएच १५ डीबी - ४०५०) वर रॉकेल टाकून पेटवून दिली. यात संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली असून या दुचाकीच्या जवळच असलेल्या आशिष कनोजिया यांची दुचाकी क्रमांक एमएच-१५ डीडब्यू-६३८६ तसेच सुनील हुदलीकर यांची दुचाकी (क्रमांक एमएच-१५ डीएक्स-४१८९) चेही नुकसान झाले आहे. अंबड पोलिसांनी दुचाकी जाळल्या प्रकरणी देवकन तायडे (रा. कामटवाडे) याला ताब्यात घेतले आहे.
संशयित देवकन तायडे याचे भाग्यश्री सोसायटीत शॉप असून, त्याने ते शॉप भाड्याने दिले आहे. त्याच्या शॉपवर येणाºया व्यक्ती या सोसायटीत असलेल्या शौचालयाचा वापर करतात. परंतु सोसायटीच्या निमयामनुसार शॉपमालकाने मेंटेनन्स देणे बंधकारक असताना तायडे मेंन्टेनंन्स देत नसून दादागिरीची भाषा करत असल्याच्या कारणावरून शनिवारी, दि.१० आॅगस्ट रोजी सोसाटीतील नागरिक व तायडे यांच्यात वाद झाला होता. सोसायटीतील नागरिकांनी तायडे यांच्या विरोधात अंबड पोलिसांना अर्ज दिल्याने तायडे यांना पोलिसांनी समज दिली होती. परंतु यानंतर तायडे यांनी याच गोेष्टीचा राग धरत सोसायटीतील दुचाकी जाळल्याने जस्बीर सिंधू, अशिष कनोजिया व सुनील हुदलीकर यांनी सांगितले.