दुचाकी चोरी करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 08:50 PM2020-09-05T20:50:54+5:302020-09-06T00:52:36+5:30
येवला : तालुका परिसरात दुचाकी चोरी करणारे दोघे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
येवला : तालुका परिसरात दुचाकी चोरी करणारे दोघे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित येवला येथे येणार होते. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. त्यात संशयित अशोक हरिभाऊ बनोटे (५०, मूळ रा. कोतुळ, ता. अकोला, जि. अहमदनगर व हल्ली रा. गोंडेगाव ता. अकोला) व गौतम भाऊराव पारखे (२८, रा. पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना हिरो स्प्लेण्डर प्रो. मोटारसायकलबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मोटारसायकल येवला शहर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी येवला तालुका व अहमदनगर जिल्ह्यात आणखी मोटरसायकल चोरी केल्याचेही पोलिसांना सांगितले. अशोक बनोटे याने त्याच्या ताब्यातील चोरी केलेली एक स्प्लेंडरप्रो ही गौतम पारखेस विनाकादगपत्राची पाच हजार रु पये किमतीस विकल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून तीन हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्रो व एक हिरो कंपनीची पॅशन प्रो अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अशोक बनोटे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात घरफोडी तसेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के. के. पाटील, एस. आर. कोळी, हवालदार शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, विशाल आव्हाड, हेमंत गिलिबले, इम्रान पटेल, निर्मळ यांनी ही कारवाई केली.