पोलीस मारहाण प्रकरणात दोन महिलांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:31 PM2020-08-07T23:31:25+5:302020-08-08T01:09:11+5:30
गंगापूर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाºया दोन महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाºया दोन महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूररोड भागातील श्री गुरुजी रुग्णालयामागील श्री राम अपार्टमेंट येथील अमिका विलास कोइनकर व सीमा विलास कोइनकर या दोन्ही संशयित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई मीरा मोटे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन्ही संशयितांनी मद्यपान केले होते. त्यांच्यात भांडण सुरू असताना ते सोडवण्याचा प्रयत्न मोटे यांनी केला. मात्र संशयितांनी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायी रूपवते यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करून पायास चावा घेतला. तसेच पोलीस ठाण्यात गोंधळ घालत फॅनची तोडफोड केली. याप्रकरणी दोघींवरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक पवार करत आहेत.