एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 01:22 AM2019-02-08T01:22:00+5:302019-02-08T01:23:25+5:30
मालेगाव मध्य : मनपा हद्दवाढीतील म्हाळधे शिवारातील गट क्रमांक १२६ मधील प्रार्थना स्थळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा महापालिका प्रशासनाने काढून कार्यारंभ आदेश देवूनही सदर कामाबाबत मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागालाही निविदा काढण्यास नाहरकत दाखला दिला आहे. परिणामी एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश निघाल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांनी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक अतिक कमाल यांनी केली आहे.

गट क्रमांक १२६ मधील संरक्षक भिंत कामाबाबत महागठबंधन आघाडीचे नगरसेवक अतिक कमाल यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे व सां. बा. विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दवाढीतील म्हाळदेशिवार गट नं. १२६ येथील प्रार्थना स्थळाचे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १४ लाख ६९ हजार ८६ रूपयांच्या कामास महासभा ठराव क्रमांक १०११ नुसार मंजुरी देण्यात आली. त्यानुसार मनपा बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात येवून शरद पाटील यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. गेल्या २१ मार्च २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले होते. स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत याच ठिकाणच्या कामाचा समावेश करण्यात आले. त्यानुसार सां. बा. विभागाने मनपास याठिकाणी विकास कामे करण्यास्तव मनपाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ५ आॅक्टोबर २०१८ रोजी निविदा काढण्यात आली. मक्तेदार एम. एम. खान यांची २६ लाख ६३ हजार ३३२ रूपयांची निविदा स्विकारण्यात येवून २२ नोव्हेंबर २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले. यामुळे एकाच कामाच्या दोन निविदा काढल्या जावून प्रत्यक्षात कार्यादेशही दिले गेले असल्याचे समोर आले आहे.
मनपा हद्दीतील विकास कामे प्रस्तावित करण्यापूर्वीच मनपाकडून कामांविषयी नाहरकत पत्र घेण्यात येते. त्यानुसार सदर कामाबाबतही मनपाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार मनपाने जा. क्र. १०६९/१८ दिनांक २९ जुलै २०१८ रोजी ना हरकत पत्र दिले आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.
-राहूल पाटील, सहाय्यक अभियंता, सा. बां. उपविभाग, मालेगाव.