कंपनीतील पत्रा तुटून दोघा कामगारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 11:27 PM2022-03-12T23:27:13+5:302022-03-12T23:27:13+5:30
वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेजवळ महामार्गावर असणाऱ्या फॅब कंपनीत पत्रे तुटून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.१२) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित कामगारांचा जागीच मृत झाल्याने उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फॅब कंपनीत पत्रे बसविण्याचे काम सुरू होते. मोहम्मद सानू खान (२८) व मोहम्मद अनास (२१, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे दोघे काम करत होते. अचानक एक पत्रा तुटल्याने ते दोघेही खाली पडले. उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि सहकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन तपासकार्य सुरू केले. या घटनेमुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. वाडीवऱ्हे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस करीत आहेत.