दोनशे वर्षांपूर्वीच्या विहिरीला अजूनही पाण्याचा स्रोत

By admin | Published: May 26, 2016 11:13 PM2016-05-26T23:13:44+5:302016-05-26T23:47:15+5:30

देवनार लाकडांपासून विहिरीचे बांधकाम

Two-year-old wells still water sources | दोनशे वर्षांपूर्वीच्या विहिरीला अजूनही पाण्याचा स्रोत

दोनशे वर्षांपूर्वीच्या विहिरीला अजूनही पाण्याचा स्रोत

Next

 पेठ : आज-काल शासनाच्या अनुदानावर खोदलेल्या विहिरी साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी एकतर चोरीला जात असतात किंवा बहुतांश विहिरींना सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खोदल्या असतानाही कोरड्याच असतात़ असे असताना पेठ तालुक्यातील तोंडवळ येथील गावाच्या पलीकडे जवळपास दोनशे वर्षांपूर्वी कोणतेही तंत्रज्ञान न
वापरता खोदलेल्या विहिरीला आजही पाणी असल्याचे दिसून येत असून,
या विहिरीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही
विहीर संपूर्ण देवनार जातीच्या सागवान लाकडाच्या साहाय्याने बांधकाम केलेली असून, हे लाकूड दोनशे वर्षांनंतरही जसेच्या तसे
आहे़
तोंडवळ हे पेठ तालुक्यातील सर्वाधिक पाणीटंचाईचे गाव वर्षानुवर्ष या गावाला उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो़ गावही तसे डोंगरावर वसलेले असल्याने शासकीय अनुदानातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र त्या नाममात्र ठरल्याने नागरिकांना दारवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना ठरलेला़ (वार्ताहर)

Web Title: Two-year-old wells still water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.