दोन वर्षात ६६ पक्षी मांजामुळे मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:53+5:302020-12-26T04:12:53+5:30
नॉयलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या जीवनावरच संक्रांत आल्याने कायद्यानुसार नॉयलॉन मांजा वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे तर पोलिसांना थेट कारवाईचे अधिकारदेखील ...
नॉयलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या जीवनावरच संक्रांत आल्याने कायद्यानुसार नॉयलॉन मांजा वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे तर
पोलिसांना थेट कारवाईचे अधिकारदेखील देण्यात आलेले आहेत. असे असतानाही नॉयलॉन मांजा वापरणाऱ्यांकडून बेजबाबदारपणे पतंगबाजी केली जाते. कटलेल्या पतंगाचा मांजा झाडे, उंच इमारती, इतरत्र ठिकाणी अडकतो आणि त्यामध्ये सापडलेल्या पक्ष्यांचा नाहक जीव जातो. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नागरिकांनी पशु-पक्ष्यांना हानिकारक असलेल्या नाॅयलॉय मांजाचा वापर करू नये, असे आवाहन नाशिक पश्चिम भागचे उप-वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी केले आहे. नाॅयलॉन मांजा पशुपक्षी, तसेच माणसासाठीदेखील घातक आहे. या मांजामुळे गेल्या दोन वर्षात ६६ पक्ष्यांचा मृत्यू तर तीनशेहून अधिक पक्षी जखमी झालेले आहेत. नागरिकांनी जागरूक होऊन मकर संक्रांतीचा पंतगबाजीचा आनंद मुक्या पक्षी जिवांच्या मृत्यूचे कारण ठरणार नाही, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
---कोट--
नागरिकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारून नायलॉन मांजा वापरला जाणार नाही याबाबत जनजागृती केली पाहिजे. ‘नायलॉन मांजा हद्दपार करूया, निसर्गाचा अस्सल दागिना सुरक्षित ठेवूया’ अशी शपथ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेवून नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा.
- पंकज कुमार गर्ग, उप वनसंरक्षक पश्चिम भाग