दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:12 PM2020-02-08T18:12:54+5:302020-02-08T18:13:28+5:30
नाशिक जिल्'ातील घटना : सुदैवाने एक जण बचावला
नाशिक : देवळा तालुक्यातील मेशी येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली आहे. या दोघा युवकांच्या मदतीसाठी गेलेला तिसरा युवक सुदैवाने बचावला आहे. दरम्यान, मृत दोघा युवकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीतील विजेचा पंप सुरू करण्यासाठी तरु ण शेतकरी संदीप नानाजी शिरसाठ (३१) गेला असता मोटारच्या लोखंडी पेटीला विजेचे करंट उतरलेले असल्याने संदीप लोखंडी पेटीला लटकला. तो मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे बघून थोड्याच अंतरावर मका पिकाला पाणी देत असलेला भूषण उर्फमनोज रमेश शिरसाठ (२३)हा त्याच्या मदतीला धावून गेला असता तोही पेटीला लटकला. दोघांची मदतीसाठी धडपड पाहून जवळच असलेला कृष्णा उत्तम शिरसाठ हा देखील त्यांच्या मदतीला गेला असता तो सुद्धा त्यांना लटकला पण सुदैवाने तो शॉक लागताच बाजूला फेकला गेला .त्यामुळे तो बचावला.
या घडलेल्या प्रकारात संदीप शिरसाठ व भूषण शिरसाठ यांना गावातील व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ रु ग्णवाहिका बोलवून देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले . मात्र, संदीप आणि भूषण यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. रु ग्णालयातील डॉक्टरांनी संदीप आणि भूषण यांना मृत घोषित केले तर जखमी झालेल्या कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर, वाघमारे, पोलीस हवालदार धोक्र ट, गायकवाड हे करीत आहेत.
गावावर शोककळा
संदीप शिरसाठ यांचा गेल्या आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संदीप शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील,भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे तर भूषण शिरसाठ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक होता. देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 'ा दुर्घटनेमुळे मेशी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी मेशी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.