शॉक लागून दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:00 AM2020-02-09T00:00:30+5:302020-02-09T00:22:44+5:30

मेशी : येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली. ...

Two young farmers die in shock | शॉक लागून दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

शॉक लागून दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमेशीमधील घटना : सुदैवाने एक जण बचावला

मेशी : येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली. या दोघा युवकांच्या मदतीसाठी गेलेला तिसरा युवक सुदैवाने बचावला. दरम्यान, मृत दोघा युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीतील विजेचा पंप सुरू करण्यासाठी तरुण शेतकरी संदीप नानाजी शिरसाठ (३१) गेला. मोटरच्या लोखंडी पेटीत वीजप्रवाह उतरला असल्याने संदीप लोखंडी पेटीला लटकला. तो मदतीसाठी आरडाओरडा करीत असल्याचे बघून थोड्याच अंतरावर मका पिकाला पाणी देत असलेला भूषण ऊर्फमनोज रमेश शिरसाठ (२३) हा मदतीला धावून गेला असता तोही पेटीला लटकला. दोघांची मदतीसाठी धडपड पाहून जवळच असलेला कृष्णा उत्तम शिरसाठ हा देखील त्यांच्या मदतीला गेला असता तोसुद्धा त्यांना लटकला; पण सुदैवाने तो शॉक लागताच बाजूला फेकला गेला. त्यामुळे तो बचावला.
या घडलेल्या प्रकारात संदीप शिरसाठ व भूषण शिरसाठ यांना गावातील व आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ रु ग्णवाहिका बोलावून देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. आमदार डॉ. राहुल आहेर आणि संभाजी आहेर यांनीही रुग्णालयात धाव घेतली. मात्र, संदीप आणि भूषण यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. डॉक्टरांनी संदीप आणि भूषण यांना मृत घोषित केले तर जखमी झालेल्या कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल झाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर, वाघमारे, हवालदार धोक्र ट, गायकवाड हे करीत आहेत.

गावावर शोककळा
संदीप शिरसाठ यांचा गेल्या आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संदीप शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे, तर भूषण शिरसाठ हा एकुलता एक होता. देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या दुर्घटनेमुळे मेशी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी मेशी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Two young farmers die in shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.