फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:33 PM2018-02-08T13:33:48+5:302018-02-08T13:35:58+5:30

या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Two young men killed in a road accident near Phalke Memorial | फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार !

फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार !

Next
ठळक मुद्देडोक्याला जबर मार मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावर अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावर फाळके स्मारकाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास समांतर रस्त्यावरुन स्वप्नील हनुमानदास वैष्णव (३२,रा. म्हसरुळ) हे  पांडवलेणीच्या दिशेने पल्सरवरुन (एमएच१५ बीके ९३२६) जात होते. यावेळी दीपक भास्कर पवार (२३रा, संसरी गाव) हा युवक दुचाकीने (एमएच१५ सीएल ९८३६) भरधावपणे वैष्णव यांच्या समोरुन विरुध्द दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मार्गस्थ होत असताना पल्सर दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत वैष्णव खाली कोसळले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघाताची माहिती रितेश बैरागी यांना त्यांचा चुलतभाऊ राहुल बैरागी यांनी दिली. रितेश यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत त्यांचा मावसभाऊ वैष्णव यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकिय अधिका-यांनी वैष्णव यास तपासून मयत घोषित केले.
या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two young men killed in a road accident near Phalke Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.