गंगापूर धरणात दोघे युवक बुडाले

By admin | Published: April 20, 2017 01:01 AM2017-04-20T01:01:31+5:302017-04-20T01:01:45+5:30

नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरुण बुडाल्याची घटना संध्याकाळी घडली.

Two young men lost their lives in Gangapur Dam | गंगापूर धरणात दोघे युवक बुडाले

गंगापूर धरणात दोघे युवक बुडाले

Next

 नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरुण बुडाल्याची घटना संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. एका तरुणाचा मृतदेह जलाशयामधून काढण्यात यश आले. तर दुसरा तरुण अद्याप बेपत्ता आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका वाइन फॅक्टरीमध्ये डेकोरेशन करण्यासाठी सहा तरुण शहरातून आले होते. काम आटोपल्यानंतर संध्याकाळी गंगापूर धरणावरील सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी हे सर्व मित्र जवळच्या सावरखेड गावालगत असलेल्या बॅक वॉटरवर पोहोचले. यावेळी इश्तियाक मुस्ताक शेख (१९, रा. लेखानगर), अभिनव सेन (२०, रा. इंदिरानगर) यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही व हे दोघे पाण्यात उतरले. दरम्यान, पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे गटांगळ्या खाऊ लागले.
यावेळी दोघेही पाण्यात बुडाल्याचे बघून त्यांच्या मित्रांनी पोलीस मुख्यालयासह, अग्निशमन मुख्यालयाला सदर बाब तातडीने कळविली. सातपूर उपकेंद्राचा बंब व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, राजेंद्र वाघ, सुभाष देवरे, मधुकर आथरे, महेमुद पटेल यांचे गस्त पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी सावरगाव ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांच्या मदतीने शोधकार्याला प्रारंभ केला. शेखचा मृतदेह बाहेर काढण्यास त्यांना यश आले. मयत शेखच्या पश्चात आई, वडील, दोन लहान भाऊ, बहीण, दाजी असा परिवार आहे. शेख हा घरात कमविणारा होता, कारण वडील दृष्टिबाधित असल्यामुळे त्याच्यावर आणि आईच्या मोलमजुरीवर उदरनिर्वाह अवलंबून होता. मंडप डेकोरेशनचे काम करून शेख कुटुंबाला हातभार लावत होता. (प्रतिनिधी)

Web Title: Two young men lost their lives in Gangapur Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.