इगतपुरीमध्ये दोन तरुणांचा पूर्ववैमनस्यातून खून

By admin | Published: June 6, 2017 03:41 AM2017-06-06T03:41:50+5:302017-06-06T03:41:58+5:30

इगतपुरी : मागील भांडणाची कुरापत काढून दोन तरुणांचा लाकडी दांडक्याने घाव घालत खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.

Two young pre-emptive murders in Igatpuri | इगतपुरीमध्ये दोन तरुणांचा पूर्ववैमनस्यातून खून

इगतपुरीमध्ये दोन तरुणांचा पूर्ववैमनस्यातून खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाजवळ मागील भांडणाची कुरापत काढून दोन तरुणांचा लाकडी दांडक्याने घाव घालत खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी दोन संशयिताना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास माणिक ऊर्फ इस्माईल अकबर पठाण ( २९ ) रा. तळेगाव व अमित ऊर्फ बंटी दिनेश बर्वे ( २६ ) रा. फुले नगर हे दोघे तरुण मद्यसेवन करण्यासाठी गेले होते. तेथे दुपारपासूनच मद्यसेवन करीत बसलेल्या रूपेश गिरीधर वारघडे (२३), रा. आठ चाळ व नरेंद्र किशोर पाटणे (२६) रा. फुलेनगर यांच्यात मागील भांडणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर संशयित रूपेश गिरीधर वारघडे व नरेंद्र किशोर पाटणे यांनी इगतपुरी शहरातील हार्डवेअर दुकानातून फावड्याचे लाकडी दांडके घेऊन मद्यसेवन करीत असलेल्या माणिक ऊर्फ इस्माईल अकबर पठाण व अमित ऊर्फ बंटी दिनेश बर्वे यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर दांडक्याने जोरदार घाव घालत दोघांचा खून केला. त्यानंतर दोघेही फरार झाले.
सदर घटनेची माहिती तलावाचा सुरक्षा रक्षक भारत सोनवणे यांना सोमवारी सकाळी समजल्यावर त्यांनी तातडीने इगतपुरी पोलीस ठाण्यात कळवली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरु न लाकडी फावड्याचे दोन दांडके, मदयाच्या बाटल्या व दोन दुचाकी जप्त केल्या. या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपासाची चक्र े वेगाने फिरवत अवघ्या ५ तासात संशयित रु पेश गिरीधर वारघडे व नरेंद्र किशोर पाटणे यांना अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Two young pre-emptive murders in Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.