दहशत पसरविणाऱ्या दोघा युवकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 22:16 IST2022-01-05T22:15:45+5:302022-01-05T22:16:13+5:30
सायखेडा : येथील कॉलेज रोडवर भर रस्त्यावर दुपारच्या वेळी धारदार चॉपर आणि चाकू हातात घेऊन जोरजोरात ओरडून दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांना सायखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दहशत पसरविणाऱ्या दोघा युवकांना अटक
सायखेडा : येथील कॉलेज रोडवर भर रस्त्यावर दुपारच्या वेळी धारदार चॉपर आणि चाकू हातात घेऊन जोरजोरात ओरडून दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांना सायखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ओम सूर्यभान जाधव (वय १९) रा. गंगापूर, नाशिक व परवेझ जावेद मनियार (२१)रा. सातपूर, नाशिक हे मंगळवारी (दि.४) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सायखेड येथील शुभम कॉम्प्युटर समोर सार्वजनिक ठिकाणी धारदार चॉपर व चाकू ही शस्त्रे बेकायदेशीररीत्या जवळ बाळगत दहशत निर्माण करण्याच्या हेतूने फिरताना व मोठमोठ्याने ओरडून सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पी. कादरी यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.