चोरचवडी धबधब्याच्या डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:12 PM2020-09-13T18:12:33+5:302020-09-13T18:13:31+5:30

पिंपळगाव वाखारी : दहिवड पासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या भौरी शिवारातील डोंगररांगातून वाहणाºया चोर चवडी धबधब्याच्या डोहात पोहणाºया वडाळीभोई येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात प्रथमच अशी दुर्घटना झाल्याने पर्यटकात भीती निर्माण झाली आहे.

Two youths drown in Chorchavadi waterfall | चोरचवडी धबधब्याच्या डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू

धबधब्याच्या डोहात बुडालेले तरु ण शुभम गुजर व व ऋ षिकेश तोटे.

Next
ठळक मुद्देदहिवड येथील भौरी शिवारातील पोहताना घडली घटना

पिंपळगाव वाखारी : दहिवड पासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या भौरी शिवारातील डोंगररांगातून वाहणाºया चोर चवडी धबधब्याच्या डोहात पोहणाºया वडाळीभोई येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात प्रथमच अशी दुर्घटना झाल्याने पर्यटकात भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या वर्षी प्रथमच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेला भौरी शिवारातल्या डोंगरातून वाहणारा चोरी चवडी धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून वाहत असला तरी तिथे जाण्यासाठी रस्त्यांची गैरसोयींमुळे दुर्लक्षित होता. परंतु यंदा लवकर आलेल्या पावसामुळे धबधबा जून जुलै महिन्यापासूनच खळाळून वाहू लागला. काही हौशी पर्यटकांनी तेथील सहलीचे फोटो सोशल मीडिया वरून व्हायरल केल्याने पर्यटकांची मोठी गर्दी यंदा धबधबा परिसरात दिसू लागली. तीन टप्प्यात वाहणारा हा धबधबा तरु णाईच्या निसर्ग सफरीचा हॉटस्पॉट झाला. संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटक यावर्षी येथे हजेरी लावत होते. दळणवळणाचे विशेष सोय नसली तरी होणारी गर्दी लक्षणीय असते. अशातच रविवारी (दि.१३)वडाळीभोई येथील युवकांचा ग्रुप येथे सहलीसाठी आला असताना धबधब्याच्या दुसºया टप्प्यातील डोहात पोहताना त्यातील शुभम नारायण गुजर (१८) व ऋ षिकेश शशिकांत तोटे (१८) यांचा दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान बुडून मृत्यू झाला. तर इतरांना वाचवण्यात यश आले. नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत डोहातून बुडश्लल्या दोघांना बाहेर काढले. पहिल्यांदाच धबधबा परिसरात घडलेल्या अपघातामुळे येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाल्याने धबधबा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्याची मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुर्घटनेचा पंचनामा करून देवळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहे.

 

Web Title: Two youths drown in Chorchavadi waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.