वालदेवी नदीपात्रात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:38 PM2018-04-02T16:38:23+5:302018-04-02T16:38:23+5:30
नांदुरवैद्य -: मुंबई नाशिक महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपाञात पोहण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह जीवनरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढला असुन दुस-या युवकाच्या मृतदेहाचा तपास सुरु आहे.
नांदुरवैद्य -: मुंबई नाशिक महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपाञात पोहण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह जीवनरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढला असुन दुस-या युवकाच्या मृतदेहाचा तपास सुरु आहे. रायगडनगर जवळील वालदेवी नदीपात्रात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या अनिल बाळु सुतार (२७, रा.सिडको,नाशिक) या युवकास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही युवकांना आपले प्राण गमवावे लागले. घटनास्थळी दाखल झालेल्या नांदगाव बुद्रुक येथील तीन जीवनरक्षकांचे मृतदेहाचे शोधकार्य सुरु असुनही यश आले नाही.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वाडिव-हे पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पी.मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नांदगाव बुद्रुक येथील तीन जीवनरक्षकांच्या मदतीने दुस-या युवकाच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे शोधकार्य सुरु आहे.