मालेगावी पीपीई किट दडवून ठेवण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:58 PM2020-05-06T22:58:27+5:302020-05-07T00:04:40+5:30
मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरातील परिस्थितीचिंताजनक बनली असतानाच आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे पीपीई किटच दडवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरातील परिस्थितीचिंताजनक बनली असतानाच आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे पीपीई किटच दडवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दलच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नवनियुक्त आयुक्त त्र्यंबक कासार व उपआयुक्त नितीन कापडणीस यांनी भांडार कक्षाची तपासणी करत हा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी आयुक्तांनी दोघा कर्मचाºयांना नोटिसा बजाविल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात मालेगावी कोरोना-बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागणी करूनही कोरोनाचा मुकाबला करणाºया कर्मचाºयांना सॅनिटाझर, हातमोजे, पीपीई किट मिळत नसल्याची तक्रार होती.
आरोग्यसेवेतील डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने पीपीई किट व सुरक्षा साहित्य खरेदी केले होते. त्यातील काही साहित्य महापालिकेला प्राप्त झाले होते. सदर साहित्य वाटप झाल्याचे सांगण्यात आले. मात्र हे साहित्य मिळाले नसल्याची तक्रार डॉक्टर व कर्मचाºयांनी केल्यानंतर आयुक्त त्र्यंबक कासार यांनी वाडिया रु ग्णालयाच्या भांडार कक्षात जाऊन पाहणी केली असता साडेतीन हजार पीपीई किट, २० हजार मास्क, दोन हजार एम-९५ मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर औषधी गोळ्या असे सामान गुदामात पडून असल्याचे समोर आले. आयुक्तांनी याप्रकरणी दोघाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचाºयांवर साहित्य वाटपाची जबाबदारी होती. या प्रकारानंतर आयुक्तांनी दोघांनाही नोटीस बजावली असून, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.