हा तर जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार
By admin | Published: December 20, 2015 11:14 PM2015-12-20T23:14:58+5:302015-12-20T23:21:49+5:30
विखे पाटील : येवल्यात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक
येवला : कोपरगाव तालुक्यात आचारसंहिता सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील शासकीय विश्रामगृहात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.
या बैठकीसाठी आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. शिवसेनेने दुष्काळ पाहणीचे दौरे करणे म्हणजे जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. या दौऱ्यापेक्षा भरीव निधी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे दिल्ली दौरे करा, असा टोला विखे यांन् ाी लगावला.
शिवसेनेला शेतकऱ्यांची
जर एवढीच चिंता असेल तर विरोधी पक्षात असताना ५५ हजार कोटी
रुपयांच्या भरीव निधीची मागणी त्यांनी तत्कालीन सरकारकडे केली होती. आता सत्तेत असताना एवढा निधी आणा व दौरे बंद करा, असेही विखे यांनी सांगितले. यावेळी तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने पालखेड कालव्याचे आवर्तन मिळावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागणीचे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. यावेळी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, अरुण अहेर, राजू भंडारी, विजय कदम, नंदकुमार, शिंदे, सौरभ घोडके, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, काजी सलीम राफिउद्दीन आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)