औद्योगिक क्षेत्रात वृक्षतोडीचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:42+5:302021-07-02T04:10:42+5:30
नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण बंद आहे. त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस आहे अशा नागरिकांना ...
नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण बंद आहे. त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस आहे अशा नागरिकांना तीन ते चार दिवसांना विलंब झाला आहे. आणखी किती दिवस विलंब होणार या बाबतचीही चिंता आहे. त्यामुळे किती दिवस विलंबाने लस घेतली जाऊ शकते, याबाबतची विचारणा केंद्रांवर होताना दिसत आहे.
रेल्वे प्रवासी संघटनेचे निवेदन
नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या गाड्यांना सर्वसाधारण तिकीट व मासिक पास सुरू करावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे प्रबंधक आर. के. कुठार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पासेस नसल्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
संचारबंदीतही रस्त्यांवरील गर्दी कायम
नाशिक:शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील निर्बंध कठोर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नाही. दुपारी ४ वाजेनंतर संचारबंदी व जमावबंदीचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आदेश कायम असतानाही शहरातील विविध भागात संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार कायम आहे.
मध्य रेल्वेच्या गाड्या सुरू
नाशिकरोड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे. या गाड्यांमध्ये मुंबई-एलटीटी-गोरखपूर गाडी दररोज धावणार असून, एलटीटी-छपरा गाडी ८ जुलैपासून दर गुरुवारी धावणार आहे. जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच गाड्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने उत्तर भारतीय प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रिक्षा, टॅक्सी पासिंगला अडचणी
नाशिकरोड : दीड-दोन वर्षांपासून रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी आदी वाहन व्यावसायिकांना फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगारही गेला असून उपासमारीची वेळ आली. त्यामुळे रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी या वाहनांचे पासिंग कोरोनामुळे दोन वर्षे वाढवून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.