शरयूनगर रस्त्यावर कचरा फेकण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:08+5:302021-07-26T04:14:08+5:30
--- पांडवनगरी रस्त्याची दुरवस्था नाशिक : इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून पांडवनगरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. ...
---
पांडवनगरी रस्त्याची दुरवस्था
नाशिक : इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून पांडवनगरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर चिखल पसरून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांवर निर्बंध आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---
नागरिकांना पाइपलाइद्वारे गॅसची प्रतीक्षा
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये रस्ते खोदून गॅस पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तसेच अनेक निवासी इमारतींमध्येही त्यासाठी तयारी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही या पाइपलाइद्वारे गॅस पुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाइपलाइद्वारे गॅस पुरवठा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.
--
ग्राहक पंचायत महिला मेळावा उत्साहात
नाशिक : ग्राहक पंचायत नाशिक जिल्हा व महानगरतर्फे गुरुपौर्णिमा व सामाजिक चतुर्मासानिमित्त महिला ग्राहक व महिला कार्यकर्त्यांचा ऑनलाइन महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या ग्राहक पंचायत सहसंघटक मेधा कुलकर्णी यांनी सहभागी ग्राहकांना आपल्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, उपाध्यक्ष ॲड. श्रीधर व्यवहारे, जिल्हा संघटक दत्ता शेळके आदींनी ऑनलाइन माध्यमातून या मेळाव्यात सहभाग नोंदविला.
----
आडगाव - जानोरी रस्त्यावरील पथदीप बंद
नाशिक : आडगाव - जानोरी रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यावर म्हाडाची स्वप्नपूर्ती सोसायटी, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय आहे. या आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.