टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:55 AM2019-09-03T00:55:28+5:302019-09-03T00:55:47+5:30

नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला

 Typewriting will continue | टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार

टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार

Next

नाशिक : नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, संबंधित संस्थांनी आपल्याकडील संस्थांनी टाइपिंग बंद करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, अनेक टाइपरायटर संघटनांनी अभ्यासक्रम बंद न करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर तसेच शासनाच्या सर्व विभागांमध्ये ई-गर्व्हर्नन्स, ई-आॅफिस पद्धत अवलंबिण्याचे शासनाने धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे २०१३ मध्ये संगणक टंकलेखनाची संकल्पना प्राधान्याने समोर आल्यामुळे मॅन्युअल टाइपरायटरच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. मात्र हा अभ्यासक्रम एकदम बंद न करता २०१५ पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि त्यानंतरही शुद्धीपत्रक काढून मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दि. १३ जुलै २०१६ ला पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ३१ मे २०१७ मध्ये मुदतवाढ देण्यात आली.
दि. १६ नोव्हेंबर च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शाासनमान्य लघुलेखन टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबत दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर सदर अभ्यासक्रम बंद करू नये यासाठी सातत्याने काही संघटनांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार शासनमान्य लघुलेखन टंकलेखन संस्थांमध्ये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली. पुढील कालावधीचा उल्लेख शासनाने दिला नसला तरी निदान आणखी काही वर्षे तरी टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार चित्र आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ
शहरी भागातील काही टाइपरायटर इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही मॅन्युअल टाइपिंग शिकविले जाते. तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. वाढीव मुदतीमुळे सर्वांचीच सोय होणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक लाभ होईल. विजेचा प्रश्न असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्यॅन्युअल टाइपरायटिंग महत्त्वाचा पर्याय ठरतो.
- सचिन जाधव, संचालक, अशोक कॉम्प्युटर अ‍ॅण्ड टायपरिंग.
जेलरोड. नाशिकरोड.

Web Title:  Typewriting will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.