उद्यान विभाग उरला नावापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:35 AM2017-07-29T01:35:54+5:302017-07-29T01:35:54+5:30
महापालिकेच्या सिडको उद्यान विभागाकडून उद्यानांमध्ये साचलेली घाण, वाढलेले गाजर गवत काढण्याबरोबरच उद्यानांची देखभाल करणे तसेच मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पथदीपांवर तसेच रस्त्याला अडथळा ठरणाºया फांद्या काढणे आदी कामे प्रामुख्याने या विभागाने करणे गरजेचे असतानाही या विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडको : येथील उद्यानांमध्ये वाढलेले गाजरगवत, खेळण्यांची दुरवस्था, वाढलेल्या झाडांच्या फांद्या याबरोबरच धोकादायक असलेल्या झाडांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असतानाही मनपाच्या सिडको उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने बघत नसल्याने तसेच कोणतेही कामकाज या विभागाच्या कर्मचाºयांकडून होत नसल्याने उद्यान विभाग हा नावापुरताच उरला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. महापालिकेच्या सिडको उद्यान विभागाकडून उद्यानांमध्ये साचलेली घाण, वाढलेले गाजर गवत काढण्याबरोबरच उद्यानांची देखभाल करणे तसेच मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पथदीपांवर तसेच रस्त्याला अडथळा ठरणाºया फांद्या काढणे आदी कामे प्रामुख्याने या विभागाने करणे गरजेचे असतानाही या विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सिडकोतील बहुतांशी ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या असून, या फांद्यामुळे पथदीप झाकले गेले आहे. यामुळे रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरून अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. एकूणच सिडको उद्यान विभागाकडून कोणतेही काम होत नसल्याने हा विभाग नावापुरताच उरला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे चांगल्या स्थितीत असलेले झाड अथवा त्यांच्या फांद्या तोडणाºयावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे उद्यान विभागाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र याबाबत फक्त पोलीस ठाण्यात नोंद करण्यापलीकडे अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही.