‘उडाण’ चे शौर्य पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:49 PM2019-01-13T17:49:25+5:302019-01-13T17:49:39+5:30
सिन्नर : समाजात संस्कार आणि संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या हातांची कमतरता भासत असतानाच्या काळात खºया अर्थाने दहा-बारा वर्षांच्या मुलांनी एखाद्याचे प्राण वाचिवण्याचे शौर्य दाखवावे, ही कौतुकाची बाब आहे.
सिन्नर : समाजात संस्कार आणि संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या हातांची कमतरता भासत असतानाच्या काळात खºया अर्थाने दहा-बारा वर्षांच्या मुलांनी एखाद्याचे प्राण वाचिवण्याचे शौर्य दाखवावे, ही कौतुकाची बाब आहे. त्यातल्या त्यात तालुका पातळीवर समारंभाचे आयोजन करून अशा मुलांना शौर्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव व्हावा हेदेखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सिन्नरचे तत्कालीन नायब तहसीलदार तथा धुळे येथील सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले.
तालुक्यातील वडागाव-सिन्नर येथील उडाण फाउंडेशनतर्फे बाल शौर्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात बारी (कळसुबाई) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरु पवार, कवी रवींद्र कांगणे, भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, ‘उडाण’चे संस्थापक अध्यक्ष भरत शिंदे आदी उपस्थित होते.मुलांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याबरोबरच त्यांना मानसिक बळ दिल्यास सक्षम पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. केरु पवार यांनी ‘उडाण’चे कार्य राजकारणापेक्षा वेगळे व समाजभिमुख असल्याचे सांगितले. कांगणे, ग्रामसेवक वाबळे यांचीही भाषणे झाली.