"राम की बात झाली, आता काम की बात करा"; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान
By संजय पाठक | Updated: January 23, 2024 14:05 IST2024-01-23T14:05:09+5:302024-01-23T14:05:38+5:30
"दहा वर्षात अयोध्येला कधी का गेले नाहीत? राम एकवचनी होता, भाजपा नाही"

"राम की बात झाली, आता काम की बात करा"; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान
संजय पाठक, नाशिक- अयोध्येत श्रीराम चंद्रांची प्रतिष्ठापना झाली हे चांगले झाले त्यामुळे राम नाम सुरू असले तरी आता राम की बात झाली आता काम की बात करा खुल्या आव्हान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. देशातील महागाई आणि अन्य सर्वच विषयांवर चर्चा करा असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे महाअधिवेशन नाशिक येथील हॉटेल डेमोक्रसी येथे पार पडले यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्ला केला. मी शिवनेरी येथे गेल्यानंतर तेथील माती अयोध्येला घेऊन गेलो योगायोगाने त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने श्री राम मंदिरात संदर्भात निर्णय दिला आणि राम मंदिराच्या निर्माणाचा विषय मार्गी लागला मी अगोदरही अयोध्येला गेलो होतो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षात आयोध्याला कधी गेले होते का? असा प्रश्न त्यांनी केला. 2014 मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर मोदींनी जगभरात भ्रमण केले मात्र ते अयोध्येला कधीही गेले नव्हते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राम रामाची बात झाली आता कामाची बात सुरू करा दहा वर्षात तुम्ही कोणती काम केली ते जाहीर करा असे ते म्हणाले.
भाजपा आणि मोदी हे प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेतात मात्र राम एक वचनी होता तुम्ही नाही कारण शिवसेना दिलेले वचन तुम्ही तोडले असे ते म्हणाले इतकेच नव्हे तर शिवसेनेला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला अशा शिवसेनेला पळवून नेणाऱ्या 'वालीं'चा शिवसैनिक वर करतील असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कट्टर शिवसैनिकांमुळे भाजपाला दिल्लीची सत्ता पाहायला मिळाली पुचाट भाजपा कार्यकर्त्यांमुळे नव्हे असे सांगून ते म्हणाले की आता हेच शिवसैनिक भाजपाला भ्रष्ट वाटायला लागले आहेत हिम्मत असेल तर पीएम केअर फंडाची चौकशी लावा असे आवाहनही ठाकरे यांनी दिले.